तुमची हल्ली लहान-सहान गोष्टींवरून सतत चिडचिड होतेय का ❓
तुमच्या मनात राग बराच काळ खदखदत राहतो का ❓
क्षुल्लक गोष्टींचा देखील खूप राग येतो का ❓
तर मग हा आजचा लेख खास तुमच्यासाठी.
.
नमस्कार🙏 मी प्राची पाटील ...
माईंडफुलनेस थेरिपिस्ट
क्षुल्लक गोष्टीवरून सतत चिडणे, राग आला की आदळआपट करणे किंवा शिव्या देणे,अर्वाच्य भाषेत बोलणे, बराच काळ राग मनात ठेवून स्वतःलाच त्रास करून घेणे या गोष्टी नकळत आपल्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत घडून जातात...
कधीकधी तर या अशा रागामध्ये बेभान कृती किंवा सैराट कृती घडत असतात. निराशेच्या भरात आत्महत्या करणे ,प्रेमभंग झाल्यास स्वतःची नस कापणे किंवा प्रेयसीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकणे किंवा तिला जाळूनच टाकणे ...जोडीदाराचा हात पकडून नकळत्या वयात पळून जाणे ......ह्या सर्व गोष्टी भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे घडतात. या सर्व गोष्टींचे कारण काय ..तर साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अशा व्यक्तींचा फक्त भावनिक मेंदू त्यावेळी काम करत असतो . वैचारिक मेंदूला भावनिक मेंदू त्यावेळी हायजॅक करतो आणि म्हणूनच या अशा सैराट कृती घडत असतात .मित्रांनो, यासाठी आपल्याला आपल्या भावनांशी संबंधित खालील गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
1) तीव्रता -
उदाहरणार्थ:- लहान-सहान कारणावरून आदळआपट करणे.
2) वारंवारता-
उदाहरणार्थ:-क्षुल्लक कारणावरून सतत चिडचिड करणे.
3)कालावधी-
उदाहरणार्थ:-छोट्या छोट्या गोष्टींचा राग बऱ्याच काळाकरता मनात पकडून ठेवणे.
या तिन्ही गोष्टींवर जर आपण नियंत्रण मिळवू शकलो तर आपण भावनिक दृष्ट्या अधिक, स्मार्ट होऊ.
.
तुम्ही म्हणाल , हे खरंच शक्य आहे ?
हो..शक्य आहे ☺
कसे ?
भावनिक बुद्धिमत्तेच्या साह्याने ...☺
🤔भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय?
स्वतःच्या भावना समजणे , त्यावर नियंत्रण ठेवता येणे आणि बदलवता येणे त्याचप्रमाणे इतरांच्या भावना समजणे, आणि त्याही बदलविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.
यशस्वी आणि आनंदी जीवनाकरता बुद्धिमत्तेने बरोबरच ही अशी भावनिक बुद्धिमत्ता असणे हे आत्यंतिक गरजेचे आहे .
भावनिक बुद्धिमत्तेमुळे आपल्या आयुष्यात खालील प्रमाणे , गोष्टी घडू लागतात.
आत्मभान
भावनिक बुद्धिमत्ता असल्यामुळे आपल्या मनात नेमक्या कुठल्या भावना चालल्या आहेत त्याचे भान आपल्याला येते.
⬇️
आत्मनियंत्रण
एकदा का त्या भावना कळल्या की मग त्यावर आपल्याला नियंत्रण मिळविता येते.
⬇️
आत्मप्रेरण
त्या भावनांवर नियंत्रण मिळविता आले की मग त्या भावना बदलविण्यासाठी आपण स्वतःला प्रेरित करू शकतो.
⬇️
परानुभूती
जेव्हा आपण स्वतःच्या बाबतीत या गोष्टी करण्यात यशस्वी होतो तेव्हाच आपण परकायाप्रवेश करून इतरांच्या भावना देखील समजून घेऊ शकतो आणि जेव्हा इतरांच्या भावना आपल्याला कळतात तेव्हाच मग सामाजिक कौशल्य अधिक प्रभावीपणे वापरून आपण एक यशस्वी व स्मार्ट जीवन जगू शकतो.
मग आता हे सगळे करायचे तरी कसे ...?
खरं तर आम्ही माईंड फुलनेस थेरिपिस्ट यासाठी वेगवेगळे सजगतेचे ट्रेनिंग देत असतो .आता ते संपूर्ण ट्रेनिंग देणे जरी शक्य नसले, तरी देखील मी काही साधे सोपे उपाय नक्कीच सांगू शकते .
मित्रांनो,
मला राग येतोय ... 🎵🎵
आता माझी सटकली 🎵🎵
ही गाणी तुम्ही नक्कीच ऐकली असतील. परंतु आता ही गाणी फक्त बोलण्यापुरती वापरायची नाहीत तर आपल्याला नेहमीच्या आयुष्यात देखील ती वापरायची आहेत.
म्हणजे नेमकं काय करायचं..?
म्हणजेच,
आपल्या मनात येणाऱ्या भावनांची नोंद करायची , आणि त्यांना नावं द्यायची...
जेव्हा आपण आपल्या मनातल्या भावनांना जाणून त्यांना नाव देतो ना, तेव्हा त्या भावनांची शक्ति आपोआप कमी होत जाते ,कारण आपण ज्यावेळी, त्यांना नाव देतो त्यावेळी त्या भावनेपासून स्वतःला वेगळे करून त्या भावना जाणत असतो .
म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी दोन साध्या-सोप्या गोष्टी करायच्या
1)भावनांचा शोध घ्यायचा म्हणजे त्या जाणायच्या.
2) भावनांचे विश्लेषण करायचे म्हणजे त्यांना नावं द्यायची.
मग काय कराल ना एवढं ...?
माईंडफुलनेस मध्ये असे सजगतेचे व्यायाम आम्ही देत असतो. विद्यार्थी ,शिक्षक, पालक आणि खरंतर प्रत्येक व्यक्तीसाठी हे सजगते चे व्यायाम फायद्याचे ठरू लागले आहेत.
परंतु माईंडफुलनेस म्हणजे नेमकं काय आहे ....?
हे जाणून घेऊया पुढच्या लेखामध्ये ....
लेख आवडल्यास शेअर करा ,कमेंट करा .
धन्यवाद ...!!!
-प्राची पाटील
.
Share


Reality khup chhan
ReplyDeleteभारीच..!👏👏👏
ReplyDelete