तुमच्या डोक्यात कायम अनावश्यक विचारांचा गुंता असतो का..?
हातात असलेलं काम वेगळं आणि डोक्यात मात्र वेगळेच विचार असं तुमच्या बाबतीत होतं का....?
तर मग हा आजचा लेख तुमच्यासाठी...
नमस्कार मंडळी 🙏मी प्राची पाटील, माइंडफुलनेस थेरिपिस्ट.
मित्रांनो, कोरोनामुळे सध्या संपूर्ण जग जरी ठप्प झाले असले तरी मोठ्यांचे वर्क फ्रॉम होम ,मुलांचा ऑनलाइन अभ्यास आणि गृहिणींची न संपणारी कामे ही मात्र चालूच आहेत. ....
बऱ्याच वेळेला असे होते की घरची कामे करताना किंवा ऑफिसमध्ये एखादं महत्त्वाचं काम करताना, खाताना, आपले हात तर यांत्रिकपणे कामे करीत असतात परंतु आपल्या डोक्यात मात्र विचारांची जणूकाही एक शृंखलाच चालू असते ...एक विचार गेला की त्याच्या पाठोपाठ दुसरा विचार...
बऱ्याच वेळेला या विचारांच्या धुंदीत आपण एखाद्या जागी , दोन मिनिटांपूर्वी ठेवलेली वस्तू कुठे ठेवली आहे हे देखिल आपल्याला आठवत नाही किंवा एका खोलीतून दुसर्या खोलीत आपण नेमके कशासाठी आलो, आहोत हेच कधी कधी आठवत नाही..
अहो इतकेच कशाला जेवताना देखील संपूर्ण लक्ष दुसऱ्याच कामात किंवा टीव्हीतच असल्यामुळे आपण नेमके काय जेवलो हेही कित्येकांना खूपदा आठवून आठवून सांगावे लागते... ह्या गोष्टी आपल्या बाबतीत कधी कधीच घडत असल्या तर त्यात काळजीचे असे काहीच कारण नाही. .. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र हे असे वारंवार ...वारंवार घडत राहते, सतत स्वतःच्या विचारांच्या तंद्रीत असल्यामुळे सतत हातून लहान-लहान चुका घडत असतात आणि मग अशा वेळेला त्या व्यक्तीचा, आत्मविश्वास ही डळमळीत होतो आणि माथी शिक्का बसतो
अँबसेंट माइंडेड...
अर्थात व्यक्तिगणिक याची कारणे जरी भिन्न भिन्न असली तरी देखील वर्तमानात लक्ष नसणे किंवा माईंड फुल नसणे हे याचे एक मुख्य आणि महत्वाचे कारण आहे...
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर गेलं गेलं आभायात...
वर्तमान सोडून बाकी सर्व काळात रमणाऱ्या या मनाची महति बहिणाबाईंनी आपल्याला क्रितेक वर्षांपूर्वीच सांगून ठेवलेली आहे.. सतत आपल्या डोक्यात काही ना काही तरी विचार चालूच असतात हात काम करीत असतात परंतु ते मात्र अत्यंत यांत्रिक तेने ....
आपण एक साधे सोपे उदाहरण पाहूया..
समजा एखादी व्यक्ती नव्यानेच कार चालवायला शिकली आहे तर अर्थातच कार चालवताना त्या व्यक्तीचे लक्ष कारचे गिअर्स, ब्रेक, एक्सिलेटर, साइड मिरर यांच्याकडेच असणार. त्यावेळेला मनामध्ये दुसरे कुठलेच विचार येणार नाहीत .परंतु तिच व्यक्ती एखादे सराईत काम उदाहरणार्थ ब्रश करीत असेल तर त्या कामासाठी ती व्यक्ती सराईत असल्यामुळे ते काम करताना मात्र त्या व्यक्तीच्या मनात असंख्य वेगवेगळे विचार येत असतात.. हा अनुभव विशेषतः जेव्हा आपण एखादे सवयीचे काम करतो त्या वेळेला प्रकर्षाने प्रत्येकाला येत असतो..
आणि जर का तुम्ही कधी निरीक्षण केले तर तुम्हाला जाणवेल कि हे विचार हे अनावश्यक असतात म्हणजे कायम भूतकाळाचे किंवा , भविष्यकाळाचे असतात आणि , बहुतांशी हे विचार निगेटिव्हिटी कडे झुकणारे असतात कारण माणसाचा मेंदू हा निगेटिव्ह बायस्ड असतो...त्यामुळे कायम माणसाला सांगावे लागते की...बी पॉझिटिव्ह..
बी निगेटिव्ह असे आपण कधीच कोणाला सांगत नाही.
आता तुम्ही म्हणाल, की विचार करूच नये का...?
विचार अवश्य करावा. कारण विचार ही एकमेव अशी गोष्ट आहे जी माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे बनवते. या विचारामुळेच मानवाने आज पर्यंत इथवर प्रगती केलेली आहे...
परंतु सतत विचारांची साखळी चालूच राहिल्यामुळे आपला मेंदू थकतो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत असे होते की एखाद्या दिवशी विशेष काही शारीरिक काम न करता ही आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं .बहुतांशवेळा त्याचे कारण हे आपल्या डोक्यात अविरत चालणारे अनावश्यक विचार हेच असतं...कारण विचारातूनच भावना उत्पन्न होत असतात आणि या भावनांच्या अनुषंगाने आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असतात ज्यावर आपले शारीरिक आरोग्य अवलंबून असते...
जेव्हा आपण हेतुपूर्वक एखादे नेहमीचे काम करताना विचार थांबवून त्या कामात त्या वर्तमानाच्या क्षणात पूर्ण लक्ष घालतो त्यावेळेला त्या कामाचा आपला आनंद द्विगुणीत होतो आणि आपल्या मेंदूला ही पुरेशी विश्रांती मिळते म्हणजेच आपल्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती मिळते. ..
बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की आम्हाला ध्यान किंवा मेडिटेशन करण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणूनच आपल्याला जर डिफॉल्ट मोड नेटवर्कला , आपल्या मेंदूला जर आराम द्यायचा असेल तर एक साधी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते...ह्यासाठी तुम्हाला खास वेळही काढावा लागणार नाही ...
१) अंघोळ हे, जवळपास प्रत्येक व्यक्तीचे नित्य कर्म आहे. यापुढे जर डिफॉल्ट मोड नेटवर्कला आराम द्यायचा असेल तर आंघोळ करताना ती सजगतेने करायची. .म्हणजे पाण्याचा शरीरावर पडणारा स्पर्श जाणायचा साबणाचा किंवा शाम्पू च सुवास जाणायचा.
मनात हे सर्व करताना अर्थातच दुसरे विचार येणार परंतु त्या वेळेस अजिबात स्वत:वर चिडायचे नाही किंवा मनात अपराधी ही वाटून घ्यायचे नाही ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनात वेगळे विचार आले आहेत किंवा मन भरकटले आहे त्या वेळेस पुन्हा , पुन्हा लक्ष अंघोळी वर केंद्रीत करायचे.
२) दुसरी ट्रिक म्हणजे आपल्या मोबाईलवर दर एका तासाने अलार्म लावून ठेवा आणि जेव्हा ही तो वाजेल तेव्हा फक्त दोन मिनिटांसाठी शांत, स्वस्थ पणे एका जागेवर बसा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन भरकटले तरी हरकत नाही. पुन्हा आपले भरकटलेले मन हे आपल्या श्वासांवर घेऊन यायचे असे फक्त दोन मिनिट करा .
येणारा विचार हा चांगला आहे की वाईट?
सकारात्मक आहे की नकारात्मक?
याचा विचार करायचा नाही. त्याला कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही ,फक्त त्या विचारांकडे बघत राहायचे आणि स्वतःशीच म्हणायचे
'ठीक आहे..बघूया हा विचार किती वेळ मनात राहतो'
जेव्हा तुम्ही विचारांना प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही त्या विचारांची शक्ती वाढवत असता. जेव्हा तुम्ही त्या विचारांना प्रतिक्रिया न देता त्यांच्याकडे त्रयस्थपणे बघता तेव्हा ते विचार निष्प्रभ होऊन ते विचार आपोआप निघून जातात.
ज्या वेळेला तुम्हाला कळते की तुमचे मन भरकटले आहे आणि तुम्ही ते पुन्हा वर्तमानात घेऊन येता.... तोच क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो ,कारण तोच खरा मेंदूला दिलेला व्यायाम असतो. .. मेंदूला कायम जर आपण असे ट्रेन केले तर असंख्य फायदे व्यक्तीला होतात. .. माईंड फुलनेस मध्ये असे वेगवेगळे सजगते चे व्यायाम मोठ्यांसाठी त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी देखील उपलब्ध आहेत. ..
आता तुम्ही म्हणाल, की हे माईडफुलनेस म्हणजे नेमकं काय..?
माईंड फुलनेस म्हणजे आपले विचार भावना शारीरिक संवेदना आणि आजूबाजूचे वातावरण याबद्दल क्षणोक्षणी जागृत राहणे .खरं तर या माईंडफूलनेस चा मूळ उगम हा बुद्धिझम मधूनच झालेला आहे...
मित्रांनो गेलेला काल हा चांगला असो अगर वाईट परंतु तो आत्ता आपल्या फायद्याचा नसतो आणि येणारा उद्या हा कोणी पाहिलेला नसतो जर काही खरं असेल तर हा ...
आत्ताचा क्षण...
जो आपण भरभरून जगायला हवा...
जो भी है बस यही एक पल है. . ..
लेख आवडल्यास कमेंट करा ,शेअर करा
धन्यवाद 🙏
-प्राची पाटील
Share






खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे
ReplyDeleteThank you dear mam
DeleteThank you dear 🙏
ReplyDeleteसकारात्मक लेख प्राची 👌👍
ReplyDeleteThank you SO much
ReplyDeleteKhup sunder
ReplyDelete