नमस्कार 🙏🏼
माझे नाव प्राची पाटील. मी एक प्राथमिक शिक्षिका आहे. गेल्या 24 वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचप्रमाणे मी एक माईंड फुलनेस थेरपीस्ट आहे. माझे एक युट्युब चॅनेल देखील आहे त्या चॅनेल ची लिंक मी खाली दिलेली आहे.या युट्युब चॅनेल वर मी स्मार्ट पेरेंटिंग बद्दल बरीचशी माहिती देत असते तुम्ही माझ्या या youtube चॅनलला नक्की व्हिजिट करा.
मला वाचनाची गायनाची आणि सूत्रसंचालन करण्याची देखील खूप आवड आहे या आवडीमुळेच ठीक ठिकाणी परीक्षक म्हणून स्पर्धेमध्ये परीक्षण करण्याचा देखील योग येतो. माईंड फुलनेस थेरपीस्ट असल्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींना कौन्सिलिंग करण्याचा योग येतो. त्यातूनच मला पॅरेंटिंग या क्षेत्रात देखील कौन्सिलिंग करण्याची संधी मिळाली त्या अनुषंगाने वेगवेगळ्या शाळेत देखील स्मार्ट पॅरेंटिंग या विषयावर माझे सेशन्स होत असतात.
या ब्लॉगवर किंवा माझ्या यूट्यूब चैनल वर मी स्वतः काही वाचलेलं वेचलेलं..निवडलेलं...सुचलेलं असं लिहत असते.आपण वाचलेलं काही... आपल्याकडे असलेले ज्ञान, आपण इतरांशी शेअर करावे आणि इतरांचे विचार... इतरांकडे असलेले ज्ञान...आपण आपल्या पदरी पाडून घ्यावे या गोष्टीत मला खूप अगम्य असा आनंद मिळतो.यासाठी हा छोटा लेख प्रपंच😊
माझ्या ब्लॉगला नक्की व्हिजिट करा आणि लेख वाचल्यानंतर आपले अमूल्य विचार कमेंट्स मध्ये नक्की लिहा.
https://youtube.com/@happythoughtshappylife4986?si=8sA8IlXxqLZiqDzs
Share

No comments:
Post a Comment