कोरोनाच्या या काळामध्ये तुमचे मन सतत एका भीती किंवा एखाद्या दडपणाखाली असते का...?
तुम्हाला सतत अस्वस्थ वाटत राहते का...?
तर मग हा आजचा लेख खास तुमच्यासाठी...
🙏 नमस्कार 🙏
मी प्राची पाटील..माइंडफुलनेस थेरिपिस्ट.
मंडळी, आजच्या घडीला समाज, आपल्या जवळची माणसं, एकमेकांना एकमेकांचा हवा-हवासा वाटणारा आधार ,मायेचा स्निग्ध स्नेहल स्पर्श, शब्देविण संवाद वाटावा असा एकमेकांचा आश्वस्त सहवास ,या सर्व गोष्टींचे हल्ली जणू काही एक वर्चुअल जगच बनले आहे. सुखदुःख ,राग ,लोभ ,माया, ममता या सर्व गोष्टींची जागा आता ईमोजींनी घेतलेली आहे .
तसेेेेेेच घरात राहून स्वतः चा धीर खचू न देणेे आणि इतरांचा वाढविणे. ..स्वतःला आणि इतरांना सकारात्मक आणि आनंदी ठेवणे ही देखील आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहेे, कर्तव्य आहे ,एक अनमोल राष्ट्रकार्य देखील आहे ..
शरीराला ज्याप्रमाणे काहीही दुखलं-खुपलं तरी आपण लगेच डॉक्टरांकडे जातो . सध्याच्या परिस्थितीत आपण थोड्या फार प्रमाणात स्वतःच स्वतःचे डॉक्टर झालेलो आहोत .नियमित वाफ घेणे, काढा पिणे ,थर्मामीटर लावणे ऑक्सीमीटर लावणे, या सर्व गोष्टींनी आपण आपल्या शारीरिक आरोग्याचे मोजमाप अगदी अचूकपणे करीत असतो .अगदी त्याच प्रमाणे
आपल्या मनात नेमकं काय चाललं आहे. . . ?
बाहेरच्या नकारात्मक आणि अस्थिर वातावरणाचा माझ्या मनावर नेमका काय किती आणि कसा परिणाम होतो आहे...?
आता, मला शांत वाटतंय की अस्वस्थ वाटतंय...?
या सर्व गोष्टी देखील आपण वारंवार तपासून पाहिल्या पाहिजेत ... हे असे केल्यामुळे नेमकं कुठल्या गोष्टीमुळे मला खरा आनंद मिळतोय ...कशामुळे मला क्षणिक सुख मिळतंय..कशामुळे मला दुःख होतंय..? माझ्या मनात नेमकी यावेळेला कुठली भावना आहे ...? या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू समजू लागतात, उमजू लागतात...यालाच 'भावनांची सजगता' असे म्हणतात
मित्रांनो या भावनांच्या प्रति सजग राहणे आयुष्यात खूप महत्वाचे असते... एकदा ही सजगता आली ना ,की मग आपली सुख आपली दुःख आपला आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर किंवा इतर व्यक्तींवर अवलंबून राहत नाही ... मुळातच जो आनंद दुसऱ्या व्यक्तीवर किंवा एखाद्या वस्तूवर अवलंबून असेल तर तो मुळात आनंद नव्हेच
तो झाला pleasure... जो क्षणिक असतो तात्पुरता असतो...
परंतु Happiness... हा मात्र चिरकाल टिकणारा असतो...
या दोहोंमधला मधला फरक ओळखायला शिका मित्रांनो ...कारण खरा आनंद हा तुमच्या मनातच दडलेला आहे..
फक्त त्याला ओळखायला शिका...
ज्याप्रमाणे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' त्याचप्रमाणे '
माझा आनंद माझी जबाबदारी..... '☺
हीच भावनिक बुद्धिमत्तेची सुरुवात असते...
ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय ?
तिचा विकास अधिकाधिक साधून आजच्या जगामध्ये स्मार्ट कसे राहायचे...?
ते पाहूया पुढच्या लेखात...
लेख आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
धन्यवाद...!!!☺🙏
-प्राची पाटील.
Share




Very informative prachi
ReplyDeleteThank you🙏
Deleteखरंच आहे. छान लिहिले आहेस.
ReplyDeleteThank you🙏
Deleteछान👌
ReplyDeleteThank you🙏
DeleteVery powerful and energetic dear
ReplyDelete