समाधानाचं मोल ....
शेवटच्या मिनिटाला पकडलेल्या लोकल मध्ये चढतानाचे समाधान. ..त्याचे कुठेच मोल नाही...
ऊतू जाणार्या दुधाचा गॅस नेमक्या वेळी बंद करण्याचे समाधान..त्याचे कुठेच मोल नाही...
फोरविलरने ने खड्डयातले निष्ठूरपणे उडवलेले पाणी शिताफीने चुकवताना चे समाधान...त्याचे कुठेच मोल नाही...
एखाद्या सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या डोळ्यातले...शाबासकी म्हणून
बाईंकडून हातावर स्टार घेतानाचे समाधान...त्याचे कुठेच मोल नाही...
नवर्याने बायकोला मारलेली थाप तिला कुठलाही संशय न येता पचनी पडल्याचे समाधान ..त्याचे कुठेच मोल नाही...
निगुतीने मांडलेल्या रस्त्यावरच्या संसारावर शाकारलेल्या न गळणार्या छपराखाली बसून तान्हुल्याला घास भरवणार्या माऊलीच्या चेहर्यावरचे समाधान...त्याचे कुठेच मोल नाही...
आणि
समाधानावर सुचलेलं काहीतरी तुमच्या पर्यंत पोचविण्याचे समाधान...त्याचे कुठेच मोल नाही...
Share
No comments:
Post a Comment