प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलांशी आपण खूप छान संवाद करावा...तशी सुरुवातही केली जाते..पण अचानकच कधीतरी गाडी रुळावरून घसरते..आणि मग हाती येते ती फक्त चिडचिड..उरतात ते फक्त गैरसमज...हे सर्व जर तुम्हाला टाळायचे असेल..नुसतं मुलांशीच नाही़ तर घरी, दारी, ऑफिस मध्ये..समाजात वावरताना जर तुम्हाला परिणामकारक संवाद इतरांशी साधावा असं वाटतअसेल तर मग हा आजचा लेख तुमच्या साठी...

डॉ. .एरिक बर्न ह्यांच्यामते सर्वसाधारणपणे व्यक्तींमधे सदर तीन प्रकारच्या वृत्ती असतात त्यालाच इगो स्टेट असे म्हंटले जाते. 


 पालक इगो/parent ego :-

प्रत्येक व्यक्तीवर आपल्या पालकांचा, 
किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या जेष्ठ व्यक्तींचा प्रभाव पडत असतो, त्यातून व्यक्तिच्या मनात चांगले वाईट, योग्य,अयोग्य...चूक,बरोबर अशी समीकरणे जुळत जातात..ती त्यांच्या बोलण्यातून जाणवतात..त्यातून तयार होतो parent ego किंवा पालक इगो..ह्या इगोतून व्यक्ति समोरच्याची काळजी वाटल्यामुळे उपदेश करण्याच्या मनस्थितीत असते..
 

बालक इगो / Child ego :-

यामध्ये असलेल्या व्यक्तीला कुठलीच जबाबदारी घेण्याची इच्छा नसते, मजा करावीशी वाटते, भविष्याचा फारसा किंवा परिणामांचा फारसा विचार करण्याची इच्छा नसते, कधीतरी किंवा सतत कुणाचा तरी आधार असावा असं वाटत राहतं. 

प्रौढ इगो / adult ego :- 

यामध्ये असलेली व्यक्ति ही प्राप्त परिस्थितीचा किंवा समोर असलेल्या माहितीचे नीट विश्लेषण करून ,लॉजिकली,शांतपणे नीट विचार करून बोलते किंवा निर्णय घेते 

जीवनात नाविन्य,सर्जनशीलता,  आनंद आणण्यासाठी प्रसंगानुरूप ह्या तिन्ही इगो स्टेट अंगीकारणे गरजेचे आहे..

संवाद हा विसंवाद केव्हा होऊ शकतो...?

समजा, एखादी व्यक्ति समोरच्याशी पालक इगो स्टेट मध्ये बोलत असेल.समोरचा त्यावेळी बालक इगो स्टेट मध्ये आहे असे त्याने गृहीत धरलेले असते, परंतु समोरचा व्यक्ति बालक भूमिकेत राहू इच्छित नसेल  तर तिथे संघर्ष चालू होतो ..

मुलांशी संवाद करताना प्रत्येक वेळी आपण पालक आहोत म्हणून पालक इगो स्टेट मधेच रहाण्याची गरज नसते..तर प्रसंगानुसार कधीतरी बालक इगो मध्ये येऊन मुलात मूल होऊन त्यांच्यांशी संवाद करणे आवश्यक असते, त्यांच्या भावना सर्वात आधी जाणून घेऊन त्या स्वीकारणे गरजेचे असते..आणि नंतर प्रौढ इगो स्टेट मध्ये येऊन त्याचे विश्लेषण करून शांतपणे मुलांना त्यांच्या वयानुसार लॉजिकली गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केला तर विसंवाद किवा चिडचिड होण्याच्या शक्यता खूपच कमी होतील. 

उदाहरणार्थ...एखाद लहान मूल उगाचंच लाइटच्या सॉकेट मध्ये बोट घालत असेल तर त्याच्या अंगावर खेकसण्या पेक्षा किंवा त्याला मारण्या पेक्षा  त्याने असे केल्याने जे परिणाम होतात त्याचे गांभीर्य जर त्याच्या वयानुसार त्याला नीट समजावलं,किंवा त्याचे प्रत्यक्ष चित्र दाखविले तर त्या मुलालाही पालकांच्या विरोधामागे काहीतरी सबळ कारण आहे ह्याची जाणीव  होते,आणि त्या गोष्टी पासून तो लांब राहू शकतो..असे केल्याने..नकळतच आपण मुलांमधे देखील अश्याप्रकारे विचार करण्याची वृत्ती बिंबवू शकतो,आपले पालक केवळ विरोधाला विरोध करत नाही तर त्या पाठीमागे काहीतरी सबळ कारणं असतात ह्याची जाणीव त्यांना हळूहळू होऊ लागते.

जर मूल वयात असेल   तर त्याच्या प्रौढ इगो ला साजेसा आपणही त्यावेळी प्रौढ इगो स्टेट अंगीकारू शकतो..त्यांना लगेचच जज न करता त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यावर प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देऊ शकतो 

शेवटी काय मंडळी,..तुम्ही पालक म्हणून मुलांशी संवाद साधताना काय किंवा एक व्यक्ति म्हणून समाजात संवाद साधताना काय ..सतत कोणत्याही एकाच इगो मध्ये न राहता, प्रसंगानुरूप, जाणीवपूर्वक जेव्हा आपण आपला इगो बदलू शकू..तेव्हा कदाचित संवाद केवळ संवाद  न राहता तो सुसंवाद होऊ लागेल.. नाही का...?

ब्लॉग आवडला असेल तर नक्की like करा कमेन्ट करा ..शेअर करा..

 



Share