दैनंदिन आयुष्यात जे काही , लहान लहान मनाविरुद्ध वाटणारे वाईट अनुभव येतात त्यामुळे तुमची सतत चिडचिड होते का....?

तो राग तुमच्या निकटवर्तीयांनी वर नेहमी निघतो का....?

आणि मग ती वेळ निघून गेल्यावर आपल्या वागणुकीचा तुम्हाला पश्चाताप होतो का....?

तर मग हा आजचा लेख खास तुमच्यासाठी... 

नमस्कार मंडळी. ..🙏

मी प्राची पाटील...एक मोटिवेशनल स्पीकर आणि फक्त एक पाऊल पुढे या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आणि पर्यायाने एक समृद्ध जीवन घडविणे हेच माझे उद्दिष्ट आहे यासाठी 'फक्त एक पाऊल पुढे' हे व्यासपीठ तुमच्यासाठी कायम खुले आहे...


मंडळी, 
मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींबद्दल होणारी चिडचिड आणि आपल्या हातात नसणाऱ्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींवर बद्दलची अनामिक काल्पनिक भिती या दोन्ही गोष्टी वरकरणी जरी आपण सहज घेत असलो ,साध्या दिसत असल्या तरी सुद्धा सतत या गोष्टी घडत गेल्यामुळे आणि त्याबद्दलची चिडचिड, भीती ही साचत जाते, आणि त्यामुळे नंतर मात्र त्याचा विपरीत मार्गाने , उद्रेक होऊ शकतो यासाठी मी आज तुम्हाला दोन अगदी सहज सोपे असे शब्द मंत्र देणार आहे...

1] तरी बरं... :-

मित्रांनो ...'तरी बरं 'हे दोन शब्द जरी दिसायला इटुकले पिटुकले असले तरीसुद्धा शुल्लक गोष्टी मनाविरुद्ध झाल्यामुळे नेहमी चिडचिड होते ती टाळण्यासाठी मात्र हेच दोन शब्द रामबाण उपाय आहेत आता उदाहरणच द्यायचं झालं तर ,डॉक्टर अनिता अवचट या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींमधून काहीतरी चांगलं शोधण्यासाठी नेहमी हा मंत्र वापरीत असत .त्यांच्या कन्या मुक्ता पुणतांबेकर या लिहितात ..कि 'एकदा आम्ही पिकनिकला निघालो असता घरापासून एक किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर आमची गाडी बंद पडली...गाडी ढकलून बाजूला लावून चालत घरी पुन्हा यावे लागले त्यावेळी वैतागून परिस्थिती बदलणार नव्हती, त्यामुळे आम्ही विचार केला... 

तरी बरं ,घरापासून जवळच गाडी बंद पडली तिकडे जाऊन बंद पडली असती तर काय केलं असतं...?

तरी बरं ,पाऊस थांबला नाही तर भिजत यावं लागलं असतं..

तरी बरं, जरा व्यायाम होतोय... 

मित्रांनो तरी बरं हे दोन शब्द असे आहेत जे आपल्याला नावडत्या परिस्थितीतून सकारात्मकता शोधायला भाग पाडते कुठलीही परिस्थिती आणि कुठलीही व्यक्ती ही पूर्णपणे वाईट नसते त्याला काहीतरी कुठेतरी एक चांगली बाजू असते... 

Every cloud has a silverlining... 

'तरी बरं 'हे दोन शब्द आपल्याला ती सिल्वर लाइनिंग शोधायला नक्कीच मदत करतात म्हणून मित्रांनो, आता यापुढे कुठल्याही परिस्थिती बद्दल मनात नकारात्मक विचार आले किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जर द्वेषभावना किंवा संताप निर्माण झाला तर ... थोड्या वेळ थांबा एक छोटासा ब्रेक घ्या आणि 'तरी बरं 'हा आपला शब्दमंत्र जपा आणि ती सिल्वर लाइनिंग शोधून स्वतःला शांत करा... 


2] जास्तीत जास्त काय होईल...? 

 मंडळी, 

काही लोकांच्या मनात भविष्यातल्या गोष्टींबद्दल एकतर खूप चिंता असते किंवा एक काल्पनिक भीती दडलेली असते,खरंतर ते काल्पनिक भीतीदायक विचार कधीच अस्तित्वात आलेले नसतात किंवा येणारही नसतात परंतु तसा विचार सतत केल्यामुळे ही लोक मात्र स्वतःची वर्तमानातली मनःशांती नक्कीच गमावून बसतात ...

अशा वेळेला काय करायचं याचा एक रामबाण उपाय म्हणजे जेव्हा अशी भीती मनात दाटून येईल किंवा चिंता चितेसमान जाळू लागेल ,त्या वेळेला 

'जास्तीत जास्त काय होणार आहे...?'

असा प्रश्न स्वतःला एका क्षणासाठी विचारून पहावा..उत्तर जे येईल इतकी वाईट परिस्थिती भविष्यात कधीच येणार नसते ,पुढे घडणाऱ्या घटनांचं दडपण आल्यावर आपण विचार करू शकतो की वाईटात वाईट काय होऊ शकतं...?अशा वेळी आपल्या लक्षात येतं की जितका आपल्याला टेन्शन आहे तितकं वाईट नक्कीच घडणार नाही, परंतु असे केल्याने विचारांचा ताण मात्र नक्कीच हलका होतो... 


मित्रांनो हे दोन्ही मंत्र परिस्थिती बदलू शकत नाहीत ,पण तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक मात्र नक्कीच करतात आणि परिस्थितीचा स्वीकार करायला मदत करतात. 

काय मग...? या पुढे आयुष्यात एखादा नकारात्मक प्रसंग घडला किंवा भविष्याची चिंता सतावू लागली तर हे दोन मंत्र नक्कीच जपून बघा आणि तुमचे अनुभव देखील नक्की कळवा...

ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कारण 

तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा 😊

धन्यवाद मंडळी😊🙏

 



Share