नमस्कार मंडळी... 🙏

जगात अशी कुठलीही व्यक्ती नाहीये जी अगदी शंभर टक्के प्रत्येक क्षणाला उत्साही आणि आनंदी असते...अशी एकही व्यक्ती नाहीये, जिला तिच्या आयुष्यात भावनांचे चढ-उतार फेस करावे लागत नाहीत... 


मित्रांनो ....आपण माणसं आहोत ..चढ-उतार ...सुखदुःख ...चांगले वाईट अनुभव ...ह्या गोष्टी आपण प्रत्येक जण अनुभवत असतो. .. 

फरक फक्त इतकाच ...की त्यातील काहीजण या चक्रव्यूहात अडकून राहतात ,रस्ता चुकतात...आणि काहीजण मात्र सर्व धूळ झटकून पुन्हा नव्या उमेदीने स्वतःचा मार्ग शोधून काढतात. .. 


"परिस्थिती हे खरंतर दुःखाचं कारण नसतं पण त्या परिस्थितीबद्दल तुमचे विचार हेच दुःखासाठी कारणीभूत असतात"- इकार्ट टोले


त्या परिस्थितीतून मार्ग काढून त्यातून बाहेर यायचं की तिथेच अडकून पडायचं हा मात्र आपला चॉइस असतो खरं तर.....आणि हा चॉईस तुमच्या मनातून सुरू होतो ...काय घडले किंवा काय घडून गेले ही तुमची ओळख नाहीये..जे घडले त्याकडे तुम्ही कसे बघता ही तुमची खरी ओळख आहे. . . 

तुम्ही जर आयुष्यात स्वतःला काही कारणाने हरवून बसला असाल तर आज मी हे पाच मार्ग तुम्हाला सांगणार आहे To get back on the track.... 🙂👍👍👍


1]  Find your WHY... 

तुम्ही आता जे करत आहात ते तुम्ही का केलं पाहिजे ...तुम्ही यशस्वी नक्की का झालं पाहिजे ..?तुम्ही हेल्दी का राहिलं पाहिजे...?तुम्हाला स्वतःला स्वतःचा विकास का करायचा आहे ...?तुम्ही पैसे का मिळवले पाहिजेत ...?तुम्ही  लढत का राहिले पाहिजे...? 

या सगळ्यांच्या पाठीमागे खरं तर काहीना काहीतरी कारणं असतात. ..आहेत ...आणि एकदा का तुम्हाला तुमचं कारण सापडलं की मग तुम्ही जे काही कराल त्यात एक , FIRE🔥असेल...एक आग असेल ...ते कारणच तुम्हाला तुमचा दिवस लवकर सुरु करायला भाग पाडेल ...दीर्घकाळासाठी तुम्हाला लढत राहण्यासाठी प्रेरणा देत राहील ...तुम्हाला आयुष्यात दुःखाचे किंवा मन खचवून टाकणारे असे प्रसंग, क्षण येतील...पण एकदा का तुम्हाला तुमचं हे कारण नीट माहिती असेल तर तुम्ही तिथे जास्त काळ राहणार नाही ...राहू शकणार नाही.. 

FIND YOUR WHY AND WRITE IT DOWN


2]  LET IT GO-

मित्रांनो , आयुष्य हे एकदाच मिळतं...ज्या गोष्टींनी तुम्ही आता प्रचंड तणावात आहात ,कदाचित आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला ती गोष्ट तितकी महत्त्वाची ही वाटणार नाही...  म्हणून ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत ...त्या गोष्टी सोडून द्यायला शिका... 


तुम्ही तुमच्या वर्तमान काळात जेे काही करत आहात तिथेच फोकस करायला शिका... तुमच्या पॅशन वर प्रेम करा... सकारात्मक विचारसरणीच्या लोकांना भेटा...त्यांच्याशी बोला त्यांच्यात राहा . .. जे तुमच्याकडे आहे त्याबाबतीत  कृतज्ञता व्यक्त करा ...अगदी मनापासनं.. विचारा स्वतःला की मी असं काय करू  शकतो ज्याने मी लोकांच्या कायम चांगल्या स्मृतीत राहीन... 


3] FEED YOUR MIND


मित्रांनो ...जसं शरीराच्या निकोप वाढीसाठी सकस अन्नाची गरज असते अगदी तसंच मनाला देखील सकारात्मक आणि शक्तिशाली विचारांच्या खाद्याची गरज असते... सकारात्मक प्रेरणादायी व्यक्तिमत्व विकासासाठी संबंधित जेवढ्या काही गोष्टी गोळा करता येतील ...जे काही तुम्हाला शक्य असेल त्या मार्गाने त्या गोळा करा ..उदाहरणार्थ ,चांगली पुस्तकं..चांगले ऑडिओज्..चांगले व्हिडीओज्...आणि चांगले गुरु ...परंतु कुठल्या ना कुठल्यातरी मार्गाने या सकारात्मक प्रेरणादायी
वातावरणाच्या सानिध्यात राहा...     स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि त्यासाठी जिज्ञासू वृत्ती आणि मन कायम मोकळे ठेवा...सतत नवनवीन शिकण्यावर भर द्या ..आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या वाढीवर विकासावर लक्ष द्या ..कटाक्ष असू द्या त्याला प्राधान्य द्या... 🙂

4] MOVE :- मित्रांनो ,संशोधनामध्ये देखील असं सिद्ध झालं आहे की व्यायामाने तणावाची पातळी बऱ्याच अंशी कमी होते व्यायाम केल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये आनंद निर्माण करणाऱ्या केमिकल्स ची निर्मिती होते... 

तेव्हा मित्रांंनो...आता जेव्हा निराश एकटा पोकळ वाटू लागेल किंवा हरवल्यासारखं वाटू लागेल त्या वेळेला लगेच व्यायामालाा सुरूवात करा 💪
किंवा छान निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा ...रनिंग करा किंवा वॉकिंग करा परंतु, नियमितपणे करा... 

झुकलेले खांदे...पुढे आलेले पोट आणि निस्तेज चेहरा मरगळलेला थकलेलं शरीराने  तुम्ही निश्चितच जास्त काळ आनंदी राहणार नाही आणि आनंदी रहावसं वाटणारही नाही
सुदृढ शरीर ..तेज:पुंज चेहरा आणि  उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या शरीराने मात्र तुमच्यातली कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते की नाही ते बघाच.. 


5] GOAL-SETTING-  मित्रांनो ...ध्येयाशिवाय जीवन म्हणजेे शिडा शिवाय जहाज ...!    ध्येय म्हणूनच महत्वाची असतात. . कारण ते आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे याची दिशा दाखवीत असतात. . . कायम तुम्हाला तुमच्या मार्गावर राहण्यास मदत करतात. . .  संशोधनामध्ये देखील हे सिद्ध झालेेय की, ध्येयहीन माणसांपेक्षा ध्येय असलेली माणसं , जास्त आनंदी राहू शकतात. . . 

तुमचे ध्येय मात्र स्पेसिफिक असले पाहिजेत...त्याच प्रमाणे ते वास्तववादी असले पाहिजे ..किती वेळा मध्ये ते पूर्ण करणार आहात....त्याच्यासाठी निश्चित  कृतीआराखडा ...सर्व तुम्ही एका कागदावर लिहून काढले पाहिजे ...
 मित्रांनो ...अशा प्रकारे जेव्हा तुमच्याकडे विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण होणारे वास्तववादी आणि निश्चित कृती आराखडा तयार असलेले एखादे ध्येय असेल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये स्पष्टता येईल ...आयुष्याला एक अर्थ प्राप्त होईल आणि जेव्हा आयुष्याचा हा असा अर्थ तुम्हाला गवसेल तेव्हा तुम्ही स्वतःला कधीच हरू देणार नाही आणि हरवू देणार नाही.

Stay Awsome
Stay productive... 
राहा फक्त एक पाऊल पुढे🙂👍

                                            -प्राची पाटील

Share